Kalu balu biography sample
काळू-बाळू इतिहासजमा
Maharashtra Times | Updated: 28 Apr 2014, 1:03 am
Subscribe
अंकुश खाडे उर्फ बाळू यांच्या निधनामुळे मराठी तमाशासृष्टीतील ‘काळू-बाळू’ची जोडी हा इतिहास बनला.
तमाशा कलेचा तीन पिढ्यांचा वारसा असलेले काळू-बाळू वयाच्या १६व्या वर्षी तमाशात उभे राहिले आणि त्यांनी तमाशा म्हणजे काळू-बाळू असे समीकरण रूढ करून टाकले.
अंकुश खाडे उर्फ बाळू यांच्या निधनामुळे मराठी तमाशासृष्टीतील ‘काळू-बाळू’ची जोडी हा इतिहास बनला. तमाशा कलेचा तीन पिढ्यांचा वारसा असलेले काळू-बाळू वयाच्या १६व्या वर्षी तमाशात उभे राहिले आणि त्यांनी तमाशा म्हणजे काळू-बाळू असे समीकरण रूढ करून टाकले.Tendulkar wife anjali biography of mahatma gandhi
त्यांच्या पोलिस हवालदारांच्या भूमिकांनी रसिकांवर अशी मोहिनी घातली की त्यांची मूळ नावे महाराष्ट्र विसरून गेला आणि काळू-बाळू हीच त्यांची ओळख बनली.
दोघांनीही आयुष्यभर निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न राहून तमाशा कलेची प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्या विनोदाने खेड्यापाड्यातल्या कष्टकरी माणसांना क्षणभर आपले दुःख विसरायला लावले. कलावंतांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखाचे, मानहानीचे प्रसंग येतात.
दलित असल्यामुळे त्यांच्यावरही अनेकदा असे प्रसंग आले; परंतु त्यांनी मनात कटुता न ठेवता कलेच्या सेवेला प्राधान्य दिले. तमाशाप्रधान मराठी चित्रपटांमधून नर्तिकेच्या नादाने बिघडलेल्या आणि व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेल्या तमाशा कलावंतांचेच चित्रण दाखवले गेले. प्रत्यक्षात अनेक तमाशा कलावंतांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कला जोपासल्याचे पाहावयास मिळते.
कवलापूरच्या सातू खाडे यांची दोन मुले शिवा आणि संभा कवलापूरकर. त्यातील संभाजी खाडे यांची जुळी मुले लहू आणि अंकुश म्हणजेच काळू आणि बाळू.
वयाच्या पाचव्या वर्षी वडील वारल्यानंतर या जुळ्यांचा आईने सांभाळ केला. कलेशी प्रामाणिक राहिल्यामुळे कलावंताला पूर्णत्व येत नाही, तर आपल्याला भरभरून देणाऱ्या समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी त्यांची धारणा होती.
याच धारणेतून त्यांनी तमाशाचे प्रयोग करून अनेक शाळांच्या इमारती बांधण्यास मदत केली. जन्मगावी कवलापूर येथे रयत शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू हायस्कूलला सभागृह बांधून देऊन गावाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. पावसाळा वगळता वर्षातील आठ-नऊ महिने त्यांचा तमाशा चालायचा. त्यातूनही दरवर्षी शाळा आणि मंदिराच्या बांधकामांच्या मदतीसाठी ते २५-३० प्रयोग आवर्जून करायचे.
१९६१मध्ये दिल्लीत इंदिरा गांधी यांनी त्यांचा तमाशा पाहून कौतुक केले होते. यशवंतराव चव्हाण त्यांच्या तमाशाचे चाहते होते. संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, कर्नाटकातही त्यांच्या तमाशाचे चाहते होते.
तमाशाचे सुमारे ११,००० प्रयोग त्यांनी केले. गेल्या काही वर्षांत तमाशातली लावणी थिएटरमध्ये आली. तिला प्रतिष्ठा मिळाली.
त्याच वेळी पारंपरिक तमाशांचे ऑर्केस्ट्रा बनले. काळू-बाळू यांनी मात्र तमाशाच्या अस्सल बाजाला धक्का लागू दिला नाही. तशी वेळ आली तेव्हा स्वतःच फडातून एक्झिट घेतली. ती घेतल्यानंतर त्यांचा जीव रमला नाही. तीनेक वर्षांपूर्वी काळू गेले. आता बाळू यांनीही निरोप घेतला.